सांगवी येथील गॅस शवदाहिनीत वारंवार बिघाड

महापालिका प्रशासन घेईना दखल

पिंपळे गुरव  -जुनी सांगवी येथील गॅस शवदाहिनीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने करोनाने मृत पावलेल्या रुग्णांचा अंत्यसंस्कार करण्यास विलंब होत आहे. गॅस दाहिनीचा बर्नर सातत्याने नादुरुस्त होत असल्याने करोनाने मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी ताटकळत राहवे लागत आहे. परंतु महापालिका प्रशासन यावर कायमचा तोडगा काढताना दिसून येत नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना मृत पावलेल्या रुग्णांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जुनी सांगवी येथील स्मशानभूमीत आणले जाते. येथे गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेने परवानगी दिल्याने पारंपरिक पद्धतीने सरणावर मृतदेह ठेवून अग्निसंस्कार करून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे सांगवी येथील स्मशानभूमीत तीन मयतांवर अंत्यसंस्कार सुरू होते. तर तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगला होते.

परंतु गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सव्वा सहा वाजता अचानक गॅस शवदाहिनीमध्ये बिघाड झाला त्यामुळे जुनी सांगवीत पारंपरिक पद्धतीने तीन मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुरू होते. तर तीन मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वेटिंगला होते. परंतु अंत्यविधी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने मृतांच्या नातेवाइकांमध्ये चिंता होती.

आधीच करोनाची नागरिकांमध्ये भीती आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील नातेवाइक धजावत नाहीत. त्यात महापालिकेची यंत्रणा कमकुवत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मशिन ऑपेरटर यांनी तात्काळ येत येथील गॅस शवदाहिनीचा बर्नरची दुरुस्ती करून शवदाहिनी सुरळीत केली. त्यामुळे महापालिका प्रशानाने करोनाकाळात मृत नातेवाइकांची आणि मृतदेहाची होणारी हेळसांड थांबणे गरजेचे आहे.

नातेवाइकांच्या मदतीला सावळे
जुनी सांगवी येथील गॅस शवदाहिनीमध्ये बिघाड झाल्याने मृतदेहावर अंत्यस्कार करायचे कुठे असा प्रश्‍न नातेवाइकांना निर्माण झाला होता. सामाजिक कार्यकर्ते राजू सावळे यांनी येथे येऊन नातेवाइकांना धीर देत औंध येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठीची व्यवस्था करून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.