प्लाझ्मा दान करा; हजार रुपये मिळवा

चऱ्होली – करोनावर पूर्णपणे यशस्वी मात करून बरे झालेल्या सर्व नागरिकांनी तसेच वैद्यकीय व प्रशासकीय सेवेतील सर्वच योद्‌ध्यांनी आपला प्लाइमा दान करावा. जे व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतील त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून एक हजार रुपये माझ्या स्वखर्चातून देण्यात येतील, असे आवाहन दिघी शिवसेना विभाग प्रमुख संतोष तानाजी वाळके यांनी प्लाझ्मा दान अभियानाद्वारे केले आहे.

करोनाचे संकट गडद झाले असताना करोनाबाधित रुग्णांना प्लाझ्माची अत्यंत गरज भासते. प्लाझ्मा मिळविण्यासाठी नातेवाइकांची एकच धावपळ सुरू होते. सोशल मीडियावरून दररोज हजारो पोस्ट प्लाझ्मा मिळविण्यासाठी फिरत असतात. कुणाला मिळतो तर कुणाच्या पदरी निराशेशिवाय काही पडत नाही. काहींना फुकट मिळते तर काहींना पैसे मोजूनही प्लाझ्मा मिळत नसल्याची भयानक परिस्थिती आहे. प्लाझ्मा दान करण्याबाबत नागरिकांमध्ये असलेली अनास्था प्रकर्षाने दिसून येत आहे.

प्लाझ्मा दान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन अनेकांचे जीव वाचविण्यासाठी एक मदतीचा हात म्हणून दिघीतील संतोष वाळके यांनी अभियान सुरू केले आहे. प्लाझ्मा दात्यांनी नोंदणी करून प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.