पवनानगर – येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु येथील आरोग्य केंद्रात विविध सुविधांची वाणवा आहे. त्यामुळे मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांनी येळसे आरोग्य केंद्रास विविध साधने भेट दिली आहेत.
मावळ भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी पुढे येऊन एक हात मदतीचा ह्या उपक्रमाचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत परिसरातील लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये उभे रहावे लागत होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुनील राक्षे यांच्याकडून मंडपाची व्यवस्था करण्यात आली. तर भाजपा मावळचे माजी अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्र येळसे येथे 1 संगणक, 4 खुर्च्या, 1 टेबल देण्यात आला आहे.
या वेळी मावळ भाजपा तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, डॉ. राजेंद्र मोहिते, नितीन घोटकुले, ज्येष्ठ नेते वाघुजी दळवी, भाजपचे माजी सरचिटणीस संदीप भुतडा, काले माजी उपसरपंच बबन कालेकर, माजी उपसरपंच किसनराव घरदाळे, येळसे गावचे सरपंच सीमा ठाकर, लोहगड सोसायटीचे अध्यक्ष गणेश धानिवले, गेव्हंडे ठाकुरसाईचे सरपंच नारायण बोडके, माजी सरपंच किसन खैरे, ज्ञानेश्वर ठाकर, विष्णू पवार, सचिन मोहिते, चंद्रकांत लोहर, विकास ठाकर, मंगेश सुतार उपस्थित होते.