पुणे : विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने एक अनोखे अभियान राबविण्यात येणार आहे.
शहरातील सर्व विद्यार्थी वस्तीगृहांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मोफत धूर फवारणी, औषध फवारणी व निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्यात येणार असून या अभियानासाठी मनविसे स्वतः याबाबतच्या सर्व यंत्रे व औषधी विकत घेतली असून पुणे मनपाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जाणार आहे.
मागील काही दिवसांपूर्वी काही विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातून काढण्यात आल्याच्या काही घटना घडल्याचे समजते, त्या वसतिगृहचालकांना मनविसे योग्य समज देखील दिली होती. कोरोनाचा संकटकाळी एकमेकांची साथ मिळणे गरजेचे आहे, वस्तीगृहातून कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना बाहेर काढू नये असे नम्र आवाहन देखील मनविसे पुणे शहर च्या वतीने करण्यात येत आहे.
शहरातील कोणत्याही वसतिगृहात मोफत निर्जंतुकीकरण करायचे असल्यास ६ एप्रिल पर्यंत 9623337777,9284440656 या क्रमांकावर संपर्क करत नोंदणी करण्याचे आवाहन कल्पेश यादव यांच्या वतीने करण्यात आले आहे.