पुणे: कोरोना विषाणूचा फटका विमान कंपन्यांना सोसावा लागतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर स्पाईसजेट’ विमान कंपनीने आपल्या कर्मच्याऱ्यांच्या वेतनात 30 टक्क्याने कपात केली आहे. कंपनीने या बाबतची माहिती आपल्या कर्मच्याऱ्यांना मंगळवारी ईमेलद्वारे कळवली आहे.
25 मार्च ते 31 मार्चपर्यंत हवाई सेवा बंद केल्यानंतर कर्मच्यऱ्यांच्या रजा बिनपगारी समजण्यात येणार आहेत. कंपनीसाठी हा सर्वात कठीण काळ असल्याचे स्पाइसजेट व्यवस्थापनाने कर्मच्याऱ्यांना कळवले आहे.