पुणे – दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच सुरू केलेल्या “स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड’ या संस्थेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 300 विद्यार्थ्यांना मोफत मेसची सुविधा उपलब्ध करुन दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “पुम्बा’ सभागृहात आयोजित कार्यक्रमात या मदतीची घोषणा करण्यात आली.
मुंबईच्या कॅरिंग फ्रेंड्स ग्रुप तर्फे ही मदत करण्यात आली आहे. या कार्यक्रमात कॅरिंग फ्रेंड्स ग्रुपचे निमेश सुमती, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख सुरेश भोसले, स्टुडंट हेल्पिंग हॅण्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, सचिव संध्या सोनवणे आदी उपस्थित होते. मदत देण्यापूर्वी सुमती यांनी विद्यार्थ्यांकडून श्रमदान करण्याची, व्यसन कधीही न करण्याची, तसेच एखाद्या गरजु व्यक्तिला मदत करण्याची शपथ घेतली. सुमती यांनी 300 विद्यार्थ्यांच्या मेसचा खर्च उचलला आहे. सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर आभार संध्या सोनवणे यांनी मानले.