नीरा येथील गाळे वाटप प्रकरणी भोवणार की लालफितीत अडकणार?
प्रशासकीय कारवाईची शिफारस : जिल्हा परिषदेकडे अहवाल सुपूर्द
नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीच्या गाळे वाटपात अनियमित्ताचा झाल्याचा टपका चौकशी समितीने ठेवल्यानंतर आता तत्कालीन 11 सरपंच/उपसरपंच, 1 प्रशासक आणि 13 ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकार्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल चौकशी समितीने जिल्हा परिषदेकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे आता नीरा येथील गाळे वाटपात तत्कालीन सरपंच उपसरपंच यांनी चुकीच्या पद्धतीने काम केल्याचे सिद्ध झाले असून या प्रकरणी कारवाईला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून नीरा ग्रामपंचायतीची ओळख आहे नीरा ग्रामपंचायतीने आपले उत्पन्न वाढावे म्हणून नीरा परिसरात बाजार पेठेत व्यापारी गाळे बांधले आहेत. ते गाळे व्यापार्यांना भाड्याने दिले आहेत. मात्र हे भाडेकरार होत असताना भ्रष्टाचार झाल्याचा व चुकीच्या पद्धतीने गाळे वाटप केल्याचा आरोप नीरा येथील रहिवासी अन्वर सादिक शेख यांनी केला होता. यानंतर याबाबत तपास करण्यासाठी मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांची एक टीम नेमण्यात आली होती.
या टीमने तपास करून गाळे वाटपात अनियमितता झाल्याचे म्हटले होते. तसा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करण्यात आला होता. मात्र अद्याप ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. मात्र, यानंतर आता दिनांक 5 एप्रिल रोजी तपास करणार्या समितीकडून याबाबत तत्कालीन सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकार्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तो अहवाल आता जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील काळात कोणावर कारवाई होते? की लालफितीच्या कागदातर्या शिफारसी आडकून राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कारवाईची शिफारस केलेले सरपंच/उपसरपंच* ** कालावधी0
दत्ताजीराव रामराव चव्हाण *** 1995 ते 2000
वंदना बाळासो भोसले ***2000 ते 2001
कल्याण राजाराम जेधे ***2001 ते 2005
माणिकताई राजेंद्र भिसे ***2005 ते 2006
लतिका बापुराव धायगुडे ***2006 ते 2007
चाँद दस्तगीर पठाण **2007 ते 2008
मिथिका रामदास देसाई ***2008 ते 2009
कुमार जनार्दन मोरे ***2009 ते 2010
राजेश अशोकराव काकडे ***2010 ते 2015
दिव्या पांडुरंग पवार ***2015 ते 2020
नामदेव दिनकर गायकवाड (प्रशासक) ***2020 ते 2021
तेजश्री विराज काकडे ***2021 ते अद्याप
शिफारस केलेले ग्रामविकास अधिकारी
डी. वाय कारंडे, बी. एन. नेवसे, जे. एम. जगताप, डी. टी. लोणकर, आर.टी. वाघमारे, डी. एस. कादबाने, सी. के. कुलकर्णी, एस. एन. ठवाळ, संजय भोसले, पी. व्ही. ढवळे, एस. बी. लिबरकर, एम. के. डेरे, राऊत.