नवी दिल्ली : राष्ट्रकुल अंजिक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक विजेती भारतीय वेटलिफ्टर खेळाडू सीमा हिच्यावर राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेने (नाडा) डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली आहे.
Indian weightlifter Seema banned for four years for a doping violation #NADA
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2019
नाडाने विशाखापट्टनम येथे झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेवेळी सीमाचे डोप नमुने परीक्षणासाठी घेतले होते. त्यामध्ये बंदी घालण्यात आलेली उत्तेजक द्रव्ये आढळल्याने तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.
नमुन्यात हायड्राॅक्सी-४, मिथाॅक्सी टेमोक्सिफेन, सिलेक्टिव्ह अॅस्ट्रोजन रिसेप्टर माॅड्युलर, अॅनाबाॅलिक स्टेराॅईड इत्यादी पदार्थ आढळून आले. हे सर्व पदार्थ वाडाच्या २०१९ च्या प्रतिबंधित औषधांच्या यादीत आहेत. हे पदार्थ कामगिरी उंचावण्यासाठी घेण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्यावर कारवाई करण्यात आली.