नवी दिल्ली : पुढील महिन्यात होणा-या हाॅकी प्रो-लीग स्पर्धेसाठी भुवनेश्वर येथे दोन आठवड्याचे प्रशिक्षण शिबीर होणार आहे. या शिबीरासाठी एकूण ३२ खेळाडूंची शनिवारी निवड करण्यात आली असून यामध्ये अनुभवी मिडफिल्डर चिंगलेनसाना सिंह आणि स्ट्रायकर दिलप्रीत सिंगचा समावेश करण्यात आला आहे.
Hockey India announced 32-member Core Probables list for the upcoming Senior Men's National Camp at #KalingaStadium Bhubaneswar. 5 from Odisha – Birendra Lakra, Amit Rohidas, Dipsan Tirkey, Nilam Sanjeep Xess & Shilanand Lakra are there in the core 32.https://t.co/SuBxA6kpE3
— Odisha Sports (@sports_odisha) December 29, 2019
दोन्हीही खेळाडू २०१८ च्या पुरूष हाॅकी वर्ल्डकपमध्ये भारतासाठी शेवटचे खेळले होते. त्यानंतर प्रथमच दोघांचा वरिष्ठ संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. चिंगलेनसाना दुखापतीमुळे गेल्या १० महिन्यापासून संघातून बाहेर होता.
हे शिबीर नेदरलँण्ड विरूध्द भुवनेश्वर येथे १८ आणि १९ जानेवारी २०२० दरम्यान होणा-या एफआयएच प्रो लीग स्पर्धेच्या तयारीसाठी कलिंगा स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंना या शिबीरासाठी मुख्य कोच ग्राहम रीड यांच्याकडे रिर्पोटिंग करावं लागणार आहे.