बोकारो – झारखंड मधील बोकारो जिल्ह्यात बंद पडलेल्या खाणीत चार जण अडकून पडल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांची मदत घेण्यात आली आहे. ही खाण भारत कुकिंग कोअल लि कंपनीची आहे. हे चारही जण तिलातंद गावचे रहिवासी आहेत.
ते या खाणीत उतरले असताना खाणीचा काही भाग कोसळल्याने ते आत अडकून पडले आहेत. पोलसांनी सांगितले की या बंद पडलेल्या खाणीत काही गावकऱ्यांकडून बेकायदेशीर खाणकाम सुरू होते. त्याच कामासाठी हे चार जण तेथे गेले होते.
अडकून पडलेल्या चार जणांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. खाणीचा कोसळलेला भाग दूर करून त्यांचा शोध घेतला जाणार आहे. हे काम जिकरीचे आहे त्यामुळे एनडीआरएफच्या पथकांना तिकडे पाचारण करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.