नवी दिल्ली – संसदेच्या एका समितीने सोशल मिडीयांच्या गैरवापराच्या संबंधात फेसबुकला नोटीस जारी केली असून त्यावरील आपले म्हणणे सादर करण्यासाठी फेसबुकचा प्रतिनिधी उद्या सोमवारी या संसदीय समितीपुढे हजर राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
माहिती तंत्रज्ञान या खात्याशी संबंधीत संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद कॉंग्रेसचे शशी थरूर यांच्याकडे आहे. सोशल/ऑनलाईन न्युज मिडीया प्लॅटफॉर्मवरून सादर केली जाणारी खोटी माहिती आणि नागरीकांच्या हक्कांचे संरक्षण या संबंधात फेसबुकची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांना समितीने नोटीस जारी केली होती.
सोशल मिडीयावर महिलांच्या सुरक्षेच्या संबंधातही या बैठकीच चर्चा होणार आहे. या समितीने वरील विषयाच्या संबंधात अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी समितीपुढे पाचारण केले आहे.