पैठण : तालुक्यातील विवाह मांडावा येथे भेटतेल्यात पोहत असताना चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हे चाहरही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळते आहे. एकाच परिवारातील चार जणांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
मृत पावलेल्या चार जणात बाप- लेक तसेच दोन सख्या भावाचा समावेश आहे. यात लक्ष्मण कोरडे व त्यांचा मुलगा सार्थक यांच्यासह वैभव व अलंकार कोरडे अशी मृतांची नावे आहेत. रविवारी दुपारी हि घटना घडली. लक्ष्मण कोरडे हे मुलगा व पुतणे यांना पोहणे शिकविण्यासाठी शेततळ्यात घेऊन गेले होते.
दरम्यान, पोहताना कुणीही पाण्यात बुडू नये म्हणून, कोरडे यांनी शेततळ्यात दोर बांधला होता. मात्र थोड्या वेळाने लक्षण कोरडे शेततळ्यातून बाहेर येताच बांधलेला दोर तुटला. त्यामुळे चारही जण पाण्यात बुडाले. कोरडे कोरडे यांच्या मुलांनी आरडाओरडा करताच त्यांनी शेततळ्यात उडी घेतली. मात्र त्यांची उडी दुर्दवी ठरली; आणि चारही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.