-->

माजी क्रिकेटपटू एजरा यांचे अपघाती निधन

जमैका – महामार्गावर सायकल चालवायला गेले असताना अचानक कारने धडक दिल्यामुळे एजरा मोसेल यांचे अपघाती निधन झाले. ते 63 वर्षांचे होते.

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला मोसेल यांनी वेस्ट इंडिजकडून 2 कसोटी व 9 एकदिवसीय सामने खेळले होते. त्यांनी कारकिर्दीत 76 प्रथम दर्जाचे सामने खेळले होते. त्यात त्यांनी 279 बळी मिळवलेहोते. लिस्ट ए सामन्यांत त्यांनी बळींचे शतक साकार केले होते.

वेगवान गोलंदाज असलेल्या मोसेल यांनी 1990 मध्ये इंग्लंडविरुद्ध सर विव्हियन रिचर्डस यांच्या नेतृत्वात दोन कसोटी सामने खेळले. या दोन सामन्यात त्यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने 6 गडी बाद केले. त्यांच्या वेगवान गोलंदाजीची त्यावेळी जगभरात चर्चा झाली होती.

पाठदुखीमुळे त्यांना काही वर्षे क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते. वयाच्या 32 व्या वर्षी मोसेल यांना कसोटी सामन्यात पुन्हा पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. एकाच डावात सर्वाधिक गडी बाद करणारा वेगवान गोलंदाज अशी त्यांची ओळखही बनली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.