मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करुन एक आठवडा उलटला आहे. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असेलेल्या आमदारांची नाराजी काही दूर होताना दिसत नाहीये. नुकतेच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये देखील बंडखोर आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या मनातील खदखद खुल्या मानाने बोलवुन दाखवली आहे. “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?” असा सवाल आमदार सुभाष साबणे यांनी केला आहे.
काय आहे ट्विट ?
” हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?असासवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे साहेबांना विचारला आहे” अशा आशयाचे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का?असासवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे साहेबांना विचारला आहे pic.twitter.com/WAIq6GeMp1
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 27, 2022
तरच शिवसेना वाचेल…
या ट्विटसोबत एक व्हिडीओ असून या व्हिडिओत आमदार सुभाष साबणे यांनी म्हंटले आहे की , काल मा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी सांगितलं मी त्या मोग्याच्या बाजूला मंडी घालून बसु का ? पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांना जेल दाखविली त्याच्या मांडीला मंडी लावून तुम्ही बसता ते तुम्हाला चालते. त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेचे बारा आमदार एक वर्ष विधान मंडळामध्ये निलंबित होतो. फक्त शिवसेना प्रमुखांच्या प्रेमामुळे आम्ही निलंबित होतो. आजही आम्हाला शिवसेनेबद्दल नितांत आदर आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि राज्यातल्या इतर शिवसैनिकांनी देखील शिंदे यांच्यासोबत यावं तरच शिवसेना वाचेल असे आवाहन आमदार सुभाष साबणे यांनी केला आहे.