पवन वर्मा यांचा तृणमूलमध्ये प्रवेश; म्हणाले, विरोधकांना ताकदवान बनवणे काळाची गरज

मुंबई – जनता दल (सं)चे माजी खासदार पवन वर्मा यांनी तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.विरोधकांना ताकदवान बनवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतीपादन त्यांनी प्रवेशानंतर केले. राजकीय परिस्थिती विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे वर्मा यांनी पत्रकरांना सांगितले. तर तृणमूल कॉमघेसने ट्विटरवरून वर्मा यांच्या पक्षातील प्रवेशाचे स्वागत केले. त्यांच्या राजकीय प्रदीर्घ अनुभवाचा लाभ द्रसातील नागरिकांच्या सेवेसाठी होईल, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वर्मा यांची प्रशांत किशोर यांच्यासह जनता दल संयुक्तमधून हकालपट्टी करण्यात आली होती. या सोघअंनी भारतीय जनता पक्षाशी युती केल्यानंतर त्यावर या दोघांनी नितीशकुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्याच बरोबर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरूनही त्यांनी टीका केली होती. पक्षातून हकालपट्ट किेल्यानंतर त्यांनी ट्विटरद्वारे नितीश कुमार यांचे आभार मानले होते. तुमचे समर्थन करण्याची वेळ माझ्यावर येणार नाही, असे त्यांनी नमूद केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.