पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक लक्ष्मण शामराव गायकवाड (वय 65) यांचे करोनाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
केंद्रिय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पिंपरी-चिंचवड शहरातील दलित चळवळीच्या विविध घटनांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनाने दलित चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता हरपल्याची भावना रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेले लक्ष्मण गायकवाड यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देत, शहरात दलित पँथरची स्थापना केली. चळवळीत त्यांना ‘तात्या’ या टोपण नावाने ओळखले जायचे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. २०) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.