माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना समन्स

नागपूर – निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रलंबित गुन्ह्यांची माहिती दडविल्याने माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाने बजावले आहेत. नागपूर पोलिसांनी गुरुवारी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठविले.

याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक महेश बनसोडे  म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांच्यावर २ गुन्हेगारी खटले निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दाखविले नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी स्थानिक न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहे. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्यावर दाखल असणाऱ्या दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. हे गुन्हे 1996 आणि 2003 मधील आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.