वरुण धवन सध्या “कुली नं. 1’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे वडील डेव्हीड धवनच या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. पण तरिही वरुण या सिनेमासाठी खूप कष्ट घेतो आहे. याच सिनेमाच्या शुटिंग दरम्यान मध्यंतरी एक अपघात घडला आणि वरुण धवन त्यामधून अगदी थोडक्यात बचावला.
एका ऍक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान डोंगराच्या अगदी कड्याजवळ एक कार लटकलेल्या अवस्थेत दाखवले गेले आहे आणि त्या कारमध्येच वरुण अडकून पडला होता. काही कोज अप शॉट घेण्यासाठी वरुणला या कारमध्ये बसावे लागले. पण शॉटचे शुटिंग झाल्यावर त्या कारचा दरवाजाच उघडेना. त्यामुळे वरुण आतच अडकून पडला. पुढे काय होते, याची चिंता सगळ्यांना लागून राहिले होती.
या स्टंटची काही वेळा प्रॅक्टीस केली गेली होती. वरुणच्या सुरक्षेची काळजीही घेतली गेली होती. मात्र तरिही ऐनवेळी काही तरी गडबड झाली. त्यामुळे वरुणचा जीव धोक्यात आला होता. सेटवर उपस्थित असलेल्या पब्लिकने खटपट करून वरुणला थोड्याच वेळात कारमधून बाहेर काढल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. “कुली नं 1’मध्ये वरुणबरोबर सारा अली खान दिसणार आहे.