नवी दिल्ली – हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना शनिवारी येथील विशेष न्यायालयाने बेहिशेबी संपत्ती जमा केल्याप्रकरणी दोषी ठरवले. आता त्यांच्या शिक्षेवरील सुनावणी 26 मे यादिवशी होणार आहे. सीबीआयने 2005 यावर्षी चौटाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर 2010 मध्ये आरोपपत्र सादर करण्यात आले.
चौटाला यांनी 1993 पासून सुमारे 12 वर्षांत 6 कोटी रूपयांची संपत्ती जमवली. ती त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा कितीतरी अधिक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौटाला यांना याआधी शिक्षक भरती घोटाळ्याबद्दल 10 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मागील वर्षी त्यांची तुरूंगातून सुटका झाली.