मुंबई : भाजपाचे नेते आणि माजी आमदार सरदार तारासिंग यांचे आज सकाळी लिलावती रुग्णालयात निधन झाले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी टि्वट करुन सरदार तारासिंग यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
My senior colleague, BJP leader Sardar Tarasing, after prolonged illnesses died at Lilavati Hospital today morning, Ishwar un ki Atma ko Shanti De Prarthana @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 19, 2020
मुलुंड विधानसभा मतदारसंघातून सरदार तारासिंग यांनी सलग चारवेळा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. १९९९ पासून ते आमदार होते.
आपल्या कार्याने सरदार तारासिंग यांनी मुलुंडला भाजपाचा भक्कम बालेकिल्ला बनवले होते. हा भाजपाचा सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. २०१९ मध्ये मात्र तारासिंग यांना पक्षाकडून विधानसभेचे तिकिट मिळू शकले नाही.