सोरतापवाडी -उरुळी कांचन (ता. हवेली) येथे रविवारी (दि. 20) माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबविणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या सदस्या किर्ती कांचन यांनी सांगितले.
या योजनेच्या नियोजनाची बैठक उरुळी कांचन येथे पार पडली यावेळी प्रशासक एन. के. धापटे, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी सुचेता कदम, केंद्र प्रमुख व शिक्षक आदी उपस्थित होते.
येथे तीन केंद्राचे केंद्रप्रमुख, 291 शिक्षक तसेच आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर हे सर्व घर टू घर सर्वेक्षण करणार आहेत.