मुंबई – तीन जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात भारतातील परकीय चलनसाठा 513 अब्ज डॉलरवर गेला आहे. ही नवी विक्रमी पातळी आहे.
या आठवड्यामध्ये भारतामध्ये 6.47 अब्ज डॉलरची आवक झाली. 5 जून रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलनसाठा 500 अब्ज डॉलरवर गेला होता. त्यानंतर यात उत्तरोत्तर वाढ होत आहे. या कालावधीत भारतात आयात कमी झाली आहे. त्याचबरोबर निर्यात फारशी वाढली नसली तरी भारतातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक झाल्यामुळे भारतातील परकीय चलनसाठ्यात वाढ होत आहे.