लोणी काळभोर- दुकानामध्ये वैधानिक इशारा नसलेल्या विदेशी बनावटीच्या सिगारेट विक्री केल्याबद्दल तिघाजणां विरोधात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य पदार्थ उत्पादने जाहिराती प्रतिबंधक व्यापार, उत्पादन, पुरवठा आणि इतर विनिमय अधिनियम 2003 चे कलम 7 (3) व 20 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी केअर ऍन्ड व्हिजीलेंन्ट फाउंडेशन, आरे रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई या संस्थेचे विनायक वळवईकर (वय 44, रा. मालाड पूर्व, मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून मनाराम चौधरी (वय 35, रा. कदमवाकवस्ती, लोणी क ाळभोर, हरीष सादीजा (वय 52, रा. गाडीतळ, हडपसर, पुणे ) व विशाल भिमराव धडके ( वय 21 वर्षे, रा. लोणी काळभोर, ता.हवेली ) या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कडून 1 लाख 72 हजार 24 रुपये किंमतीच्या विदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार केअर ऍन्ड व्हिजीलेंन्ट फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण परब आहेत. परब यांना गुप्त बातमीदारांमार्फत लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही दुकानांमध्ये विदेशी बनावटीच्या सिगारेट विकल्या जात आहेत. या सिगारेटवर वैधानिक इशारा छापलेला नसतो, अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने शनिवार (दि. 29) वळवईकर व क्रसाड अगेंस्ट टोबॅको मोमेंटचे संचालक क्लेमेंट स्टीफन फॅरो हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सदर बाबत माहीती दिली.
- 566 सिगारेट बॉक्स जप्त
गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी पोलीस हवालदार समीर चमनशेख, रोहिदास पारखे, सागर कडू यांना त्यांचे बरोबर कारवाई करण्यासाठी पाठवले. या पथकाने कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन येथील चौधरी यांचे दुकानात 18 हजार 140 रूपये किंमतीचे एकूण 58 विदेशी सिगारेटचे बॉक्स, सादीजा याचे दुकानात 47 हजार 880 किंमतीचे एकूण 170 विदेशी सिगारेटचे बॉक्स व धडके याच्या दुकानात 1 लाख 6 हजार 4 रुपये किंमतीचे एकूण 338 विदेशी सिगारेटचे बॉक्स असे तिन दुकानातून एकूण 1 लाख 72 हजार 24 रुपये किमतीचे विन, गुडंग, गरम, ब्लॅक, रूली रिवर, मॉण्ड, गोल्ड स्टॅग, डनहिल, पॅरीस, ईसी लाईट, डेविड ऑफ, कॅमल, क्लासीक, बेनसन एजेस, एक्स्ट्रा, अब्सुलेट आपाची या विदेशी कंपनीचे 566 सिगारेट बॉक्स जप्त के ले आहेत. तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.