सिडनी : नेटली स्कीवरच्या शानदार अर्धशतकी खेळीनंतर सोफी एकलेसटोनच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामन्यात वेस्टइंडिजचा ४६ धावांनी पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह इंग्लंडचा संघ भारत, दक्षिण आफ्रिकानंतर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे. नेटली स्कीवर सामन्याची मानकरी ठरली.
🤳🏴
England become the third #T20WorldCup semi-finalists!#ENGvWI pic.twitter.com/fVTQ2vzcQi
— T20 World Cup (@T20WorldCup) March 1, 2020
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना नेटली स्कीवरच्या ५७(५६), डेनिले वाईटच्या २९(२७), एमी जोन्सच्या नाबाद २३(१३) आणि कैथरीन ब्रंटच्या नाबाद १०(०४) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १४३ धावा केल्या होत्या. वेस्टइंडिजकडून शकेरा सेलमान, एफी फ्लेचर, अनिसा मोहम्मद आणि स्टेफनी टेलर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
त्यानंतर इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १४४ धावांचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा डाव १७.१ षटकांत ९७ धावसंख्येवर संपुष्टात आला. वेस्टइंडिजकडून फलंदाजीत ली-एन कर्बीने २०(१५), ब्रिटनी कूपरने १५(१६), स्टेफनी टेलरने १५(१८), हेली मैथ्यूजने १०(२२) आणि आलियाह एलीन हिने १०(७) धावांची खेळी केली.
इंग्लंडकडून सोफी एकलेसटोनने ३.१ षटकांत ७ धावा देत सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. सारह ग्लेनने ४ षटकांत १६ धावा देताना २ विकेट घेतल्या. तर, मैडी विलियर्स आणि आन्या श्रबसोल यांनी प्रत्येकी १ विकेट घेत संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.