दिनांक २६ फेब्रुवारी २०२० बुधवार रोजी पुणे येथे शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या मिटकॉन या संस्थेच्या वतीने समाजभूषण या पुरस्काराने विविध क्षेत्रातील तज्ञांना गौरवण्यात आले. प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मिटकॉन या संस्थेने याचे आयोजन बालेवाडी येथे केलेले होते.
या मध्ये १२ वर्षांपासून पुण्यातील झील कॉलेज मध्ये कार्यरत असलेल्या झिबकार चे संचालक डॉ.सचिन चव्हाण व झेडकोर व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ.ऋषिकेश काकांडीकर यांना त्यांनी केलेल्या विविध शैक्षणिक उत्कर्षासाठी सन्मानित करण्यात आले.
झील एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी संचालक श्री.प्रदीप खांडवे व झेडकोर चे प्राचार्य डॉ.अजित काटे यांनी दोन्ही सत्कारमूर्ती चे अभिनंदन केले तर संस्थेचे सचिव जयेश काटकर यांनी शुभेच्छा दिल्या.