पुणे: आज देशभर मराठी भाषा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत आहे. आज पुण्यात ‘मी मराठी,स्वाक्षरी मराठी’ असा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला सर्वच वयोगटातील नागरिकांनी हजेरी लावली.
महाराष्ट्र नवनिर्मान रोजगार विभागातर्फे मराठी भाषा दिनानिमित्त ‘मी मराठी, स्वाक्षरी मराठी हे’ अभियान राबवण्यात आले. या अभियानात पुणेकरांनी सहभाग घेतला होता. या अभियानाचं यंदाचं 11वं वर्ष होतं.