नवी दिल्ली : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, अखेर अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात येणार असून सर्वांना दर्शन घेता येणार आहे.सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त देशभरातील नागरिकांना राम ज्योती प्रज्वलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी मंदिर आतून अतिशय भव्य पद्धतीने सजवण्यात आले आहे.
मंदिर आतून फुलांनी सजवलेले आहे. त्याचबरोबर विविध प्रकारची लायटिंग व्यवस्था मंदिरातील दर्शनासाठी करण्यात आली आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दृश्य.
मंदिरात अखंडपणे धार्मिक विधी केले जातात.
राम मंदिराचे आतील दृश्य.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राम मंदिर सजवले.