पुणे – सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स तर्फे पी.के.इंटरनॅशनल स्कूल अँड जुनिअर कॉलेज येथे निर्माण करण्यात आलेल्या रोबोटिक्स व स्पेस लॅबचे उद्घाटन सोमवारी (दि. २२) सांयकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास इस्रोचे माजी संचालक पद्मश्री प्रमोद काळे, माजी वैज्ञानिक वि.बी.लाल, सतीश राव, सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्सचे संचालक हर्षद गेलडा, इंडो सायन्स एज्युकेशन ट्र्स्टचे अध्यक्ष सतीश पिसे आदी उपस्थित राहणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, विज्ञान शिक्षण संदर्भात त्याची रुची वाढावी या उद्देशाने या सेंटर ची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, रोबोटिक्स, कोडिंग, खगोल विज्ञान या संदर्भात शिक्षण देण्यात येणार आहे. रोबोटिक्स व स्पेस लॅब ही पिंपळे सौदागर येथील पी.के.इंटरनॅशनल स्कुल अँड जुनिअर कॉलेज मध्ये सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्सचे संचालक हर्षद गेलडा यांनी दिली आहे.