न्यूयॉर्क – अमेरिकेत आजपासून फाईव्ह जी सेवा सुरु होत असतानाचा दुसरीकडे अनेक विमान उड्डाणे रद्द केली गेली आहेत. भारताच्या एअर इंडियानेही अमेरिकेची उड्डाणे रद्द केली आहेत. फाईव्ह जी तंत्रज्ञानामुळे एअर लाईन्सच्या फ्रेक्वेंसीमध्ये बाधा निर्माण होऊ शकते, अशी आशंका यापूर्वीच अनेक विमान कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
युनायटेड एअरलाईन्सने अमेरिका सरकारला फाईव्ह जी सेवा विमान उड्डाणावर गंभीर प्रभाव पाडू शकते. त्यामुळे काही काळासाठी फाईव्ह जी सेवा सुरवात पुढे ढकलावी, अशी विनंती केली होती. दुबईच्या एमिरेटस एअरलाईनने सुद्धा हा धोका लक्षात घेऊन त्यांची अमेरिकेला जाणारी उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे.
अमेरिकेच्या अन्य बड्या विमान कंपन्यांनी बायडेन प्रशासनाला हस्तक्षेप करावा आणि फाईव्ह जी सेवा काही काळासाठी प्रलंबित करावी, असे पत्र दिले आहे. त्यावर 10 विमान कंपन्यांनी सह्या केल्या आहेत. त्यात एअर लाईन्स आणि टेलिकम्युनिकेशन कंपन्यांमध्ये चर्चा सुरु आहे.