नगर -डीजे वाजविण्यास विरोध केल्याने नऊ जणांच्या टोळक्याने पाच जणांना तलवार, लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. नगर तालुक्यातील हिवरेझरे शिवारात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. गंगुबाई जयसिंग काळे (वय 60), गणेश जयसिंग काळे, माधव भानुदास काळे, भाऊसाहेब भानुदास काळे, कल्याण भगवंत काळे (सर्व रा. हिवरे झरे) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
याप्रकरणी मंगळवारी रात्री नगर तालुका पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, आर्म ऍक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी गंगुबाई काळे यांनी फिर्याद दिली. आप्पासाहेब गंगाराम काळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, ज्ञानेश्वर आप्पा काळे, तुषार भाऊसाहेब काळे, सचिन भाऊसाहेब काळे, जालिंदर गंगाराम काळे, नारायण गंगाराम काळे, नवनाथ विलास काळे, राहुल ज्ञानदेव भापकर (सर्व रा. हिवरे झरे) यांच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.
मंगळवारी सकाळी फिर्यादी गंगुबाई व त्यांचा पुतण्या भाऊसाहेब भानुदास काळे हे दोघे भाऊसाहेब गंगाराम काळे यांना म्हणाले, तुम्ही आमच्या वस्तीजवळ डिजे वाजवू नका, असे म्हणताच आरोपींनी तलवार, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भांडण सुरू असताना फिर्यादींच्या गळ्यातील गंठण व बोरमाळ तुटून गहाळ झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.