केडगाव – दौंड तालुक्यातील केडगाव आणि सोनवडीत आज पुन्हा पाच नवे रुग्ण आढळल्याची माहिती डॉ. अशोक रासगे यांनी दिली. करोना विषाणूचा विळखा दौंड तालुक्यात घट्ट होताना दिसत आहे.
केडगाव आणि सोनवडी गावात नव्याने पाच रुग्ण दिसून आले आहेत. दौंड तालुक्यातील पूर्व भागातील बेरीबेल येथे करोनाचा एक रुग्ण सापडला होता. त्याच्या संपर्कातील बारा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.