ओतूर – येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची श्रावणी सोमवार यात्रा करोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली; मात्र परंपरेनुसार पाचव्या श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात शिवलिंगावर
तांदळाच्या पाच कलात्मक पिंडी तयार झाल्या होत्या. शिवलिंगावर विधिवत पूजा पाठ अभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले होते.
प्रशासनाच्या आदेशानुसार करोना पार्श्वभूमीवर यात्रा बंद आहेत. परंपरेनुसार श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थांच्या पदाधिकारी व ग्रामसाथांनी तांदळाच्या कलात्मक पिंडी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाचव्या श्रावणी सोमवारी तांदळाच्या पाच कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या.
पहाटे श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व ओतूरच्या सरपंच गीता पानसरे यांच्या शुभहस्ते महाअभिषेक, आरती करून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले.