पहा…’83’ सिनेमाच्या टीमचा फर्स्ट लुक

निर्माता-दिग्दर्शक कबीर खान यांचा 1983 मधील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित ’83’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग या सिनेमामध्ये भारतीय संघांचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत असून या चित्रपटाचा फर्स्ट लुक आता प्रदर्शित करण्यात आला आहे.

प्रदर्शित करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये ’83’ सिनेमाच्या कलाकारांची संपूर्ण टीम दिसून येत आहे. सध्या धर्मशाला येथे सिनेमातील संपूर्ण कलाकरांना कपिल देव यांच्या कडून प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. ’83’ सिनेमाचे शूटिंग सुरु होण्याआधीच निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 10 एप्रिल 2020 मध्ये ’83’ हा सिनेमा रुपेरी पडद्यावर येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.