मतदान करून परतत असताना अपघात ; ३ ठार

गडचिरोली –  मतदान करून परतत असताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेमध्ये  ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील शंकरपूर या गावात ही घटना घडली असून मतदान करून परत येताना हा अपघात झालेला आहे.

आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मतदान करून झाल्यानंतर परत येत असताना हा दुर्देवी अपघात झालेला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप पर्यंत समजू शकले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.