प्रथमच वारकरी सांप्रदाय निवडणूक रिंगणार : पांडुररंग शितोळे अपक्ष उमेदवार
राजगुरुनगर- खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 30) पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला, असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुचित्रा आमले यांनी दिली.
खेड आळंदी विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून पहिला उमेदवारी अर्ज वारकरी सांप्रदायातील व्यक्तीने पहिल्यांदाच विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पांडुरंग नागोराव शितोळे (रा. आळंदी देवाची) यांनी अपक्ष पदाचे दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. शितोळे महाराजां समवेत मोठ्या संख्येने आळंदी मधील कीर्तनकार, वारकरी आले होते.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पांडुरंग शितोळे यांनी सांगितले की, राज्यात विविध मतदारसंघात सर्व प्रकारचे उमेदवार दिले जात आहेत मात्र, वारकरी पंथाचा आमदार होत नाही म्हणून आम्ही खेड-आळंदी मतदारसंघ वारकऱ्यांसाठी सरकारने करावा अशी मागणी आहे. नुकत्याच आळंदी येथील वारकऱ्यांच्या बैठकीत वारकऱ्यांसाठी विधानसभेच्या निवडणुकीत राखीव जागा असावी. असा ठराव केला आहे. त्यातूनच आम्ही उमेदवारी दाखल केली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता ही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- दिलीप मोहिते आज अर्ज भरणार!
खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात एकूण 13 अर्ज वितरित करण्यात आले आहेत. त्यापैकी एका अपक्ष उमेदवाराने दोन उमेदवारी अर्ज सादर केले. मंगळवारी (दि. 1) माजी आमदार दिलीप मोहिते उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती असून याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर “व्हायरल’ होत आहेत.