पुणे – पुण्यात बांधकाम व्यावसायिकाची गोळी झाडून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास वानवडी परिसरात एका वाळू सप्लायरवर गोळीबार केल्याची घटना घडली. मयूर विजय हांडे (वय.29,रा. हांडेवाडी रोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.
ही घटना येथील इनामदार ग्राऊंडच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत घडली. हांडे यांच्या गालाला गोळी चाटून गेली असून, उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयूर हांडे याचा वाळू सप्लाय करण्याचा व्यावसाय आहे. सोमवारी सकाळी बाराच्या सुमारास ते वाळू टाकण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन इनामदार ग्राऊंच्या शेजारी असलेल्या मोकळ्या आले होते. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी त्यांच्या गालाला चाटून गेली असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालायता दाखल करण्यात आले आहे.