दोन जवान शहीद
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये जवानांकडून दहशवाद्यांना शोधण्याची मोहीम राबवली जात आहे. हे करत असतानाच दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. चकमकीनंतर देखील परिसरात शोधमोहीम सुरूच आहे.
Two Indian Army soldiers have lost their lives during a cordon & search operation in Nowshera sector(J&K). The operation is still in progress. Further details awaited. pic.twitter.com/yIk6GMdZzD
— ANI (@ANI) January 1, 2020
या परिसरात काही दहशतवादी लपून बसलेले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर जवानांकडून या ठिकाणी शोधमोहमी राबवल्या जात होती, दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारास जवानांकडूनही चोख प्रतित्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, मध्यरात्रीपासून जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.