सोनई – राम जन्मभूमी व बाबरी मशिदीचा निकाल आज न्यायालयाने दिला. त्यानंतर दोघांनी फटाके वाजवल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राम जन्मभूमी, बाबरी मशिद निकाल आज जाहीर झाला. त्या अनुषंगाने सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुपारी सव्वा वाजता पोलीस पेट्रोलिंग करत होते.
सपोनि सोनवणे, पोहेकॉ आव्हाड, पोना पालवे, पोकॉ बाबा वाघमोडे हे पेट्रोलिंग करत होते. यावेळी ते ग्रामपंचायत पेठेतून जात असताना गणेश विष्णू हरदे व अशोक विष्णू हरदे (रा. सोनई) हे घराच्या छतावर फटाके उडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ आव्हाड हे करत आहेत.