पुणे : पुण्यातील मंगळवार पेठ येथील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग लागल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली. जुन्या बाजारातील किमान ८ दुकाने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.