करोना रुग्णांच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने दोन डाॅक्टरांवर FIR

सोलापूर  – सोलापूर शहरात करोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्गामुळे मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून मृत व्यक्‍ती झालेल्या व्यक्‍तींची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे. यामध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचे आढळलेल्या दोन खासगी डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी मनपा आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी स्वतः मृत व्यक्‍तींच्या घरी जाऊन त्या व्यक्‍तीचा मृत्यू कशामुळे झाला किंवा त्यांना काही गंभीर आजार होता का, याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरच्या क्‍लिनिकला भेट दिली. त्यावेळी हा हलगर्जीपणा उघड झाला.

सोलापूर येथील शांतीनगर, विजापूर रोड येथील 84 वर्षाच्या इसमास श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने ते निर्मल क्‍लिनिकचे डॉ. युवराज माने यांच्याकडे 12 एप्रिल रोजी गेले होते. डॉ. माने यांनी रुग्णाची कोविड19 ची तपासणी केली नाही. तसेच सदर रुग्णाची माहिती महापालिकेच्या नागरिक आरोग्य केंद्रास दिली नाही.

या रुग्णास श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना ई.एस.आय हॉस्पिटल होटगी रोड येथे कोविड वॉर्डात आंतररुग्ण म्हणून दाखल झाले. त्याच दिवशी सकाळी या रुग्णाचे निधन झाल्याचे डॉ. पी. आर. नंदीमठ यांनी कळवले. त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे त्यांची कोविड तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले.

निर्मलचे डॉ. युवराज माने यांनी रुग्णाबाबत हलगर्जीपणा केल्यामुळे आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून सोलापूर पालिकेचे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी डॉ. माने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केले आहे. तसेच अक्कलकोट रोड येथे डॉ. जी.बी विश्‍वासे यांचे नित्यानंद दवाखाना आहे, त्याठिकाणी भेट दिली असता रजिस्टर तपासल्यावर अनियमितता आढळून आली.

त्यांच्याकडील आलेल्या रुग्णांची माहिती व्यवस्थित देत नसल्याने तसेच सौम्य लक्षणे असलेल्या व माध्यम लक्षणे असलेल्या व्यक्तींची करोना तपासणी करण्याकरिता आरोग्य केंद्राकडे माहिती देत नसल्याने त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.