मांजरी – हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिंक्य सुरेशराव घुले यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त ‘शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर’ या कोविड सेंटरला मदतीचा धनादेश देण्यात आला आहे.
हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिंक्य सुरेशराव घुले यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगरमध्ये सुरू केलेल्या ‘शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर’ या कोविड सेंटरला सुमारे एक्कावन हजार रुपयांचा धनादेश देऊन मदत केली.
यावेळी मांजरी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक विश्वास भापकर, एमक्युर फार्माचे निलेश टकले, उद्योजक शत्रूग्न गव्हाणे आदिजण उपस्थित होते. स्वर्गीय अजिंक्य घुले यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यकाळात नेहमीच समाजातील सर्व स्तरातील सर्व घटकांना मदत केली आहे. त्याच जाणीवेतून आज या कोविड सेंटरला मदत करून अजिंक्यच्या स्मृतींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भावना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित घुले यांनी व्यक्त केली.