गाझियाबाद – देशात करोना विषाणू संकटाने थैमान घातले आहे. विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नव्या बाधितांच्या संख्येबरोबरच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करतानाच सरकार व आरोग्ययंत्रणा मोडकळीस आल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीमध्ये आता फंगल इन्फेक्शन अर्थात बुर्शीजन्य आजारांनी डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे. ( yellow fungus infection )
देशातील अनेक राज्यांमध्ये करोनातून बरे झालेल्या रुग्णांना ब्लॅक फंगस (म्युकोरमायकोसिस/ काळी बुरशी) इन्फेक्शन होत असल्याचे आढळून आले होते. हा आजार करोनाच्या गंभीर संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे आढळून आल्यानंतर अनेक राज्यांनी याला साथीचा आजार देखील घोशीत केलं आहे. यानंतर काही ठिकाणी व्हाईट फंगस (पांढरी बुरशी) इन्फेक्शनच्या केसेस देखील समोर आल्या होत्या.
मात्र, आज उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका रुग्णामध्ये यलो फंगस (पिवळी बुरशी) आढळून आल्याने वैद्यकीय तज्ज्ञ देखील बुचकळ्यात पडले आहेत. ( yellow fungus infection )
याबाबत बोलताना, गाझियाबाद येथील कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. बी.पी. त्यागी यांनी, यापूर्वी यलो फंगस (पिवळी बुरशी) हा आजार केवळ सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये पाहायला मिळाला होता. मात्र प्रथमच हा आजार मानवामध्ये पाहायला मिळाला असल्याचे म्हंटले.
असा सापडला गाझियाबादमधील पिवळ्या बुरशीचा रुग्ण
“येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचे सिटी स्कॅन केले असता त्याच्या सायनसची स्थिती (नाकाशी संबंधित अशी कवटीतील पोकळी) सामान्य असल्याचे आढळले. मात्र जेव्हा आम्ही इंडोस्कोपी केली, तेव्हा त्याला तीन प्रकारच्या फंगसचे इन्फेक्शन झालं असल्याचं आढळलं. त्याला ब्लॅक, व्हाईट व यलो फंगसचे इन्फेक्शन झाले आहे. सामान्यतः यलो फंगस हा केवळ सरपटणाऱ्या जीवांमध्ये आढळून येतो मात्र रुग्णाला याचेही इन्फेक्शन झाले आहे.” अशी माहिती कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. बी.पी. त्यागी यांनी दिली. ( yellow fungus infection )
Ghaziabad | A 45-yr-old patient’s sinus was normal in CT scan but after performing endoscopy we came to know that he contracted 3 types of fungi (Black, White & Yellow). Yellow fungus is generally found in reptiles. I found this first time in human: Dr BP Tyagi, ENT specialist pic.twitter.com/i5e1Cn0ttt
— ANI UP (@ANINewsUP) May 24, 2021