पुणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या “स्टुडन्ट हेलपिंग हॅन्ड” या संस्थेला एका खाजगी कंपनीने सीएसआर निधीतून पाच लाख रूपांची मदत केली आहे. या मदतीतून 25 विद्यार्थिनीस संपुर्ण शैक्षणिक शुल्क मदत, तसेच 25 विदयार्थींनीना वर्षभर मोफत मेसची सोय करण्यात अली आहे.
यावेळी चेतन धारीया,भास्कर वाघ, स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. ही मदत धनादेशाद्वारे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच उपस्थितांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रस्तावना चेतन धारीया यांनी तर सुञसंचालन तेजल कदम यांनी केले.
महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्याभागातून आलेल्या विद्यार्थ्यांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पुण्यामध्ये शिक्षण घ्यावे लागत आहे. संस्थेला मिळालेला निधी हा गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे कुलदीप आंबेकर यांनी सांगितले.