अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी व्यवस्थापक अखेर ‘एनसीबी’समोर हजर

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी व्यवस्थापक करिश्‍मा प्रकाशची ड्रग्ज प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. इतके दिवस सगळ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करणारी करिश्‍मा अखेर एनसीबीसमोर हजर झाली आहे.

मागील काही दिवसांपासून एनसीबी करिश्‍माला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावत होती. मात्र, करिश्‍मा एनसीबीसमोर हजर होत नव्हती. इतके दिवस ती कुठे होती याची माहिती अद्याप उघड झालेली नाही.

करिश्‍मा प्रकाश ही दीपिका पदुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली.

दरम्यान, आजच्या चौकशीत जर करिश्‍माने दीपिकाचे नाव घेतले, तर कदाचित एनसीबीच्या तपासाची सुई पुन्हा एकदा दीपिकाकडे वळू शकते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.