पिंपरी – लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम कमाली शेख (रा. बिजलीनगर, आकुर्डी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आर. ठुबल यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी वसीम शेख याने 30 एप्रिल रोजी सकाळी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केले होते. लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ तयार करणे, प्रसारित करणाऱ्यांवर एक संस्था निगराणी करत आहे.
वसीम शेख याने प्रसारित केलेल्या व्हिडीओची माहिती संबंधित संस्थेला मिळताच संस्थेने दाखल केलेल्या अहवालावरून वसीम शेख याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 चे कलम 67 (ब), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 14 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.