FIH Pro League 2024 (Indian MensTeam) : भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी FIH प्रो लीग 2023-24 मध्ये गतविजेत्या नेदरलँड्सचा शूटआउटमध्ये 4-2 असा पराभव केला. भारत विरुद्ध नेदरलँड सामना निर्धारित वेळेत 2-2 असा बरोबरीत होता. भारत आणि नेदरलँड यांच्यातील हा सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळला गेला.
Victory in Bhubaneswar!
Never say never as the Captain’s penalty corner delivers a clutch goal, making the match a thrilling tie.
The game reached a nerve-wracking shootout showdown, and we snatched the victory with an incredible 4-2 score in shootout!
India 🇮🇳 2 -… pic.twitter.com/iRtbLAWMQ1
— Hockey India (@TheHockeyIndia) February 11, 2024
निर्धारित वेळेत भारताकडून हार्दिक सिंग (13वे मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (58वे मिनिट) यांनी गोल केले, तर नेदरलँड्सकडून जेन्सेन झिप (30वे मिनिट) आणि बिजेन कोएन (39वे मिनिट) यांनी गोल केले. भारताकडून हरमनप्रीत, सुखजीत, ललित कुमार उपाध्याय आणि समशेर सिंग यांनी शूटआऊटमध्ये गोल केले.
#FIHProLeague24 : एफआयएच स्पर्धेत भारतीय हाॅकी संघाची विजयी सुरुवात…
निर्धारित वेळेत स्कोअर बरोबरीत राहिल्यानंतर भारताने शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-2 असा पराभव केला. भारतीय संघ आता आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवार, 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता खेळणार आहे.
दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी स्पेनचा 4-1असा पराभव करून FIH प्रो लीग 2023-24 स्पर्धेला सुरुवात केली. भुवनेश्वरमध्ये भारत विरुद्ध स्पेन सामना झाला. भारताकडून हरमनप्रीत सिंग (7वे आणि 20वे मिनिट), जुगराज सिंग (24वे मिनिट) आणि ललित कुमार उपाध्याय (50वे मिनिट) यांनी गोल केले, तर स्पेनसाठी मिरालेस मार्क (34वे मिनिट) याने आपल्या संघासाठी एकमेव गोल केला.