FIH Pro League 2024 (Indian MensTeam) : भारतीय पुरुष हॉकी संघाने शनिवारी स्पेनचा 4-1असा पराभव करून FIH प्रो लीग 2023-24 स्पर्धेला सुरुवात केली. भुवनेश्वरमध्ये भारत विरुद्ध स्पेन सामना झाला.
भारताकडून हरमनप्रीत सिंग (7वे आणि 20वे मिनिट), जुगराज सिंग (24वे मिनिट) आणि ललित कुमार उपाध्याय (50वे मिनिट) यांनी गोल केले, तर स्पेनसाठी मिरालेस मार्क (34वे मिनिट) याने आपल्या संघासाठी एकमेव गोल केला.
Power in every stroke! 🇮🇳🏑
India conquer Spain with a stellar performance, securing a well-deserved victory.
India 🇮🇳 4 – Spain 🇪🇸 1
Goal Scorers:
7′(PC) 20′(PS) Singh Harmanpreet
24′ Singh Jugraj (PC)
50′ Upadhyay Lalit Kumar34′ Miralles Marc (PS)#HockeyIndia… pic.twitter.com/fHNWap4i6A
— Hockey India (@TheHockeyIndia) February 10, 2024
सामन्याच्या 7व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून भारतीय संघाने आपले खाते उघडले. भारतासाठी हा गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केला आणि पहिल्या क्वार्टरच्या शेवटपर्यंत भारताने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंग अँड कंपनीने आपले आक्रमण अधिक तीव्र केले आणि 20व्या मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर करून भारताचा स्कोअर 2-0 असा नेला.
दरम्यान, 22व्या आणि 24व्या मिनिटाला भारताने आणखी दोन पेनल्टी कॉर्नर मिळवलं, मात्र यावेळी जुगराज सिंगने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर गोलपोस्टमध्ये पाठवून आपले खाते उघडले आणि भारताची आघाडी वाढवली. भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्या हाफपर्यंत 3-0 अशी आघाडी कायम ठेवली तर मार्क मिरॅलेसच्या नेतृत्वाखालील स्पेन संघ पहिल्या हाफपर्यंत कोणत्याही संधीचा फायदा घेऊ शकला नाही.
मात्र, स्पेनच्या संघाने उत्तरार्धात पुनरागमन केले आणि 34व्या मिनिटाला मिरॅलेस मार्कने पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर करून संघाचे खाते उघडले, पण भारतीय संघाने चौथ्या क्वार्टरमध्ये याचा प्रतिकार केला, जेव्हा ललित कुमार उपाध्यायने उत्कृष्ट पासचा ताबा घेत मैदानी गोल केला. अशा प्रकारे भारताने सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. भारत विरुद्ध स्पेन सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली आणि अखेरीस स्पेनचा 4-1 असा दणदणीत पराभव केला.
FIH प्रो लीग 2023-24 च्या ओडिशा टप्प्यात स्पर्धा करणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकावर असलेला संघ आहे. भारतीय संघ आता आपला पुढचा सामना नेदरलँड्सविरुद्ध रविवारी, 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30 वाजता खेळणार आहे.