पिंपरी – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन महिलांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच एकमेकींचे केस धरून झोंबाझोंबी केली. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी दोन वाजता एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या आवारात घडली.
तबासून सुलेमान इनामदार (वय 50), प्रज्ञा गणेश बहिरट (वय 40, दोघी रा गंधर्वनगरी, मोशी) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक दीपमाला लोहकरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला.