‘तानाजी’, ‘छपक’ आणि ‘दरबार’ एकाच वेळी होणार प्रदर्शित
मुंबई:नवीन वर्ष काही दिवसात सुरू होणार आहे आणि पहिल्या महिन्यात बॉक्स ऑफिसवर मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘दरबार’ हा चित्रपट, दीपिका पादुकोणचा ‘छपक’ आणि अजय देवगणचा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ एकाच वेळी 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे. अशा परिस्थितीत तिन्ही चित्रपट एकमेकांना कठोर स्पर्धा देतील.
रजनीकांत यांचा ‘दरबार’
रजनीकांत यांच्या ‘दरबार’ चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर.मुरुगादोस यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत 25 वर्षानंतर परत येणार आहेत. यापूर्वी 1992 च्या तामिळ चित्रपट ‘पांडियन’ मध्ये ते पोलिस अधिकारी म्हणून झळकले होते. याशिवाय 1982 साली रिलीज झालेल्या ‘मुंदरू मुगम’ या चित्रपटात तो अलेक्स पांडियन नावाच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात कीर्ती सुरेश आणि मीना खुशबू देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. डी. इमान या चित्रपटाचे संगीतकार आहेत.
दीपिका पादुकोणचा ‘छपाक’
नुकताच दीपिका पादुकोण यांच्या ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यात दीपिका अॅसिड हल्ल्याची शिकार लक्ष्मी अग्रवालच्या भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. या चित्रपटात विक्रांत मस्सी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
तानाजी: द अनसंग वॉरियर
‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपट अजय देवगणच्या एडीएफ आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजने निर्मित केला आहे. 17 व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. अजय व्यतिरिक्त सैफ अली खान, काजोल, शरद केळकर यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.