नवी दिल्ली – राजधानी दिल्लीच्या दक्षिण पश्चिम भागात हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. महिपालपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. सोनिया असे मयत मुलीचे नाव आहे.
27 फेब्रुवारी रोजी व्हीके दक्षिण पोलिसांना महिपालपूर येथील लक रेसिडेन्सी हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हॉटेलच्या खोलीत घुसून सोनियांची हत्या करण्यात आली. शिवम नावाच्या तिच्या मित्राने ही हत्या केली आणि त्यानंतर तो तेथून पळल्याचा आरोप आहे.
हत्येची माहिती मिळताच डीसीपी दक्षिण पश्चिम घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझियाबादचा रहिवासी शिवम चौहान आणि तरुणी गेल्या चार वर्षांपासून मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. शिवमने 25 फेब्रुवारीला ती खोली बुक केली होती.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे घरच्यांना सांगून ती अनेकदा प्रियकरासह 1,2 दिवसांसाठी घराबाहेर पडली होती. मृत मुलीच्या बहिणींचे म्हणणे आहे की, मृत तरुणी नेहमी तिच्या प्रियकरासोबत लग्नाबाबत बोलायची आणि शिवम हे टाळत असे. त्यानेच तिचा खून केला असावा असा संशय तरूणीच्या बहिणींना आहे.